शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

यंदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होणार: योगी आदित्यनाथ

By अविनाश कोळी | Updated: May 1, 2024 21:59 IST

सांगलीत भाजपची प्रचार सभा, काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदुंचे विभाजन.

लाेकमत न्यूज नेटवर्क, सांगली : काँग्रेसने लोकांच्या आस्थेचा सन्मान कधीच केला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांचे केवळ दोनच आमदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातून काँग्रेस इतिहासजमा होईल, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर बुधवारी भाजपची प्रचार सभा पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपचे नेते शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जनसुराज्य पक्षाचे नेते समीत कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, मनसेचे तानाजी सावंत आदी उपस्थित होते.योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसच्या काळात संविधानिक संस्था भ्रष्टाचाराने बरबटल्या होत्या. भाजपने त्या भ्रष्टाचारातून मूक्त केल्या. अनेक वर्षे सत्तेवर असूनही आयोध्येत काँग्रेसला राम मंदिर उभारता आले नाही. भाजपने मंदिर उभारल्यानंतरही आजअखेर एकही काँग्रेस नेता मंदिरात आला नाही. केवळ व्होटबँक जपण्याचे काम काँग्रेस करीत आहे. आस्थेचा सन्मान त्यांनी कधीच केला नाही.

देशात काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदुंच्या विभाजनाचा धोका आहे. जाती-धर्माच्या नावावर विभाजन करुन सत्तेवर राहण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. हिंदुंच्या अधिकारावर ते दरोडा टाकतील. गोमांस विक्रीला खुली परवानगी देऊन या देशात मोठे पाप करण्याच्या विचारात ते आहेत. त्यामुळे अशा आस्थेशी खेळणाऱ्या पक्षाला रोखण्याची जबाबदारी जनतेची आहे.

मुघल म्युझियमचा डाव उधळला

आग्रा येथे काँग्रेसच्या काळात मुघल म्युझियम उभारण्याचा डाव होता. आम्ही तो उधळून लावला. आता त्याठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे संग्रहालय उभारत आहोत, असे आदित्यनाथ म्हणाले.

ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांकडे जाणार

काँग्रेस सत्तेवर आल्यास ओबीसींचे आरक्षण कपात करुन ते मुस्लिम समाजाला देण्यात येणार आहे. मुस्लिम व्होट बँक सांभाळण्यासाठीच त्यांची धडपड सुरु आहे, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.

कामगारांना देशोधडीला लावले

संजय पाटील म्हणाले, विशाल पाटील यांनी अनेक सहकारी संस्था बंद पाडल्या. कामगारांना देशोधडीला लावले. आजपर्यंत केवळ स्वत: सुखात राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अशा विचारधारेच्या माणसाला जनताच जागा दाखवेल.

आदित्यनाथ यांना डमरु भेट

आदित्यनाथ यांना सभास्थानी गणपतीची प्रतिमा आणि मिरजेच्या कलाकारांनी तयार केलेले डमरू वाद्य भेट दिले. यावेळी योगी यांनी डमरु वाजवून लोकांना अभिवादन केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाMahayutiमहायुतीsangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४