शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या हाती घड्याळ की कमळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:27 IST

भूमिका जाणून घेण्यासाठी मदनभाऊ गटाची आज बैठक : काँग्रेसमध्येच थांबण्याचा काही कार्यकर्त्यांचा सल्ला

सांगली : येथील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी बुधवार दि. ४ जून रोजी दुपारी ४ वाजता बैठक बोलवली आहे. ही बैठक कळंबी (ता. मिरज) येथे होणार आहे. या बैठकीस मदनभाऊ पाटील समर्थक कार्यकर्त्यांना बोलवले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपमध्ये जावे, याचा फैसला होणार आहे. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये थांबण्याची विनंती जयश्रीताई यांच्याकडे केली आहे.सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद सोडविण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही अपयश आले होते. यातूनच काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी झाली. जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे सांगलीची जागा काँग्रेसने हातची गमावली अशी मतदारसंघात चर्चा रंगली होती. निवडणुकीच्या दरम्यानच काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करून सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. यामुळेच जयश्रीताई पाटील या काँग्रेसपासून दूर होत्या.येत्या चार महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काही तरी भूमिका स्पष्ट करा, अशी मदनभाऊ समर्थकांनी जयश्रीताई यांच्याकडे मागणी केली होती. काही समर्थकांनी काँग्रेसमध्ये थांबून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपणास पाठबळ देतील, असे म्हटले आहे.मोजक्याच कार्यकर्त्यांनी जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास गट वाढीसाठी पाठबळ मिळेल, असे सुचविले आहे. कार्यकर्त्यांच्या या सर्व भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जयश्रीताई पाटील यांनी कळंबी येथे बुधवारी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये जयश्रीताई यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही तरी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणूनच, कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी मदनभाऊ प्रेमी सर्वच कार्यकर्त्यांची कळंबी (ता. मिरज) येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील भूमिका घेणार आहे. - जयश्रीताई पाटील, उपाध्यक्षा, जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार