शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Lok sabha2024: सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी; नाराज काँग्रेसची बंडखोरीची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:55 AM

जिल्ह्यातील काँग्रेसचे नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली

सांगली : शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिल्या यादीत सांगलीसाठीचंद्रहार पाटील यांची उमेदवारी बुधवारी सकाळी जाहीर झाली. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते नाराज झाले असून, त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली आहे. अन्यथा बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेने (उबाठा) कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर दावा केला. त्याला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. तरीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बुधवारी पहिल्या यादीत चंद्रहार यांच्या उमेदवारीचा समावेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी बुधवारी दिल्ली गाठली.

डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वणुगोपाल, मुकुल वासनिक व सलमान खुर्शीद यांची भेट घेतली. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, त्याचा हक्क आम्ही सोडणार नसल्याची आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना सांगलीची जागा सोडणार नसेल, तर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना पक्षाच्या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सांगलीवरून आघाडीत बिघाडी?महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर चर्चा आहे. असे असताना शिवसेनेने परस्पर यादी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतेय.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसchandrahar patilचंद्रहार पाटीलvishal patilविशाल पाटील