शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सातबारा नेण्याची गरज नाही : महसूलमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 17:43 IST2020-02-14T17:28:34+5:302020-02-14T17:43:42+5:30
राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना संगणकावर डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सात बारा घेऊन जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय अद्यादेश लवकरच निघेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सातबारा नेण्याची गरज नाही : महसूलमंत्री
कडेगाव : राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना संगणकावर डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सात बारा घेऊन जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय अद्यादेश लवकरच निघेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
कडेगाव येथे सांगली जिल्ह्यातील महसुल विभागाची आढावा बैठक संपन्न झाली .या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते .यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले, राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ७/१२ आणि ८ अ डिजिटल उतारांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात मी महसूलमंत्री असताना शेतकऱ्यांना ऑनलाइन सात बारा उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता हे काम पूर्ण होत आहे.
यामुळे ज्या कामासाठी शेतकऱ्यांचा सात बारा हवा आहे त्या कामाशी संबधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा उतारा डाऊनलोड करून घेता येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.