दुधगावमध्ये सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:32+5:302021-04-12T04:23:32+5:30

गावातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १०४७ येथे भोसले यांचे घर आहे. ...

Complaint regarding encroachment on government land in Dudhgaon | दुधगावमध्ये सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत तक्रार

दुधगावमध्ये सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत तक्रार

गावातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १०४७ येथे भोसले यांचे घर आहे. घरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे. त्यावर दोघांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. या दुकानामुळे घराच्या राहदारीस अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, मात्र ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने कार्यवाही केली नाही. बांधकाम विभागाकडे दीड वर्षापासून अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा करीत आहे, परंतु त्यांच्याकडून टाळटाळ केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण १५ एप्रिलपर्यंत हटवून न्याय द्यावा, अन्यथा १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा भोसले यांनी निवेदनात दिला आहे.

Web Title: Complaint regarding encroachment on government land in Dudhgaon