Sangli: ब्रेकअपनंतर वादंग : प्रियकर, प्रेयसीच्या गटात बेदम हाणामाऱ्या; चौदा जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:37 AM2024-05-22T11:37:05+5:302024-05-22T11:37:22+5:30

सांगली : शहरातील समर्थ घाट परिसरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे ...

Clash between two groups on suspicion of harassing a broken up girlfriend in sangli | Sangli: ब्रेकअपनंतर वादंग : प्रियकर, प्रेयसीच्या गटात बेदम हाणामाऱ्या; चौदा जणांवर गुन्हे

Sangli: ब्रेकअपनंतर वादंग : प्रियकर, प्रेयसीच्या गटात बेदम हाणामाऱ्या; चौदा जणांवर गुन्हे

सांगली : शहरातील समर्थ घाट परिसरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे आठ जण जखमी झाले आहेत. ब्रेकअप झालेल्या प्रेयसीला त्रास देत असल्याच्या संशयावरून ही मारामारी झाली.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौदा जणांवर गुन्हे दाखल केले. आदित्य श्रीराम वैद्य (वय २१, रा. वैद्य सहनिवास, झुंझार चौक, गावभाग, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रियकर व प्रेयसी यांच्यातील भांडण सोडविण्यास गेलेल्या पाच जणांना आठ जणांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी बदडून काढले. ही घटना नदीकाठी स्वामी समर्थ घाटावर घडली. वैद्य यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अरबाज मुजावर आणि त्याच्या अनोळखी आठ साथीदारांवर गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आदित्य वैद्य आणि प्रथमेश सातपुते हे दोघे मित्र आहेत. प्रथमेशची मैत्रीण आणि तिचा सध्याचा प्रियकर अरबाज मुजावर यांच्यात रविवारी रात्री समर्थ घाटावर वाद सुरू होता. त्यावेळी अरबाजने तिला मारहाण सुरू केली. यादरम्यान त्याच परिसरात असणारे आदित्य आणि प्रथमेश, तसेच त्यांचे मित्र स्वयम, सुमित आणि हेमंत हे मारहाण थांबविण्यासाठी धावले. त्यावेळी अरबाजने, आमच्या भांडणात तुम्ही मध्ये का आलात? असा जाब विचारला. आपल्या आठ साथीदारांना बोलावून घेतले. या सर्वांनी आदित्य व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीनेही मारले. आदित्य यांच्या दुचाकीचीही (एमएच १० सीझेड १७७७) तोडफोड केली. त्यात गाडीचे १० हजारांचे नुकसान जाले.

ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीला त्रास

दरम्यान, याच प्रकरणात अरबाज अन्वर मुजावर (वय २१, रा. नेहरूनगर, लव्हली सर्कल, संजयनगर, सांगली) यानेही फिर्याद दिली. त्यानुसार अरबाज आणि त्याची प्रेयसी लग्न करणार होते, पण घरच्यांच्या विरोधामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. त्याची प्रेयसी ही प्रथमेश (पूर्ण नाव माहिती नाही) याची पूर्वीची मैत्रीण होती. ‘अरबाज हा आपल्या मैत्रिणीला त्रास देत आहे’, असा प्रथमेशचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याने सहा साथीदारांसह समर्थ घाटावर येऊन अरबाजला काठीने मारहाण केली. त्यावेळी अरबाजला वाचविण्यासाठी त्याचे वडील आणि मावसभाऊ आले. त्यांनाही संशयितांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील चौदा संशयितांवर गुन्हे दाखल केले.

Web Title: Clash between two groups on suspicion of harassing a broken up girlfriend in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.