शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात रसायनाचा भडका, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:02 IST

प्रयोगशाळा अधिकाऱ्याचा समावेश

सांगली : भोसे (ता. मिरज) प्राथमिक आरोग्य केंद्रात रासायनिक द्रव्याचा भडका उडाला. यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेश्वरी चौगुले (वय ३५) यांच्यासह तिघे जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाजले आहे. जखमींमध्ये चौगुले यांच्याह हिंद लॅबचा कर्मचारी सूरज मुल्ला व केंद्रातील कर्मचाऱ्याची मुलगी धनश्री चौरे (वय ११ वर्षे) यांचा समावेश आहे.तिघांवरही मिरजेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी सकाळी केंद्रात क्षयरोग तपासणीविषयक काम सुरू असताना, ही दुर्घटना घडली. या प्रक्रियेत रुग्णाच्या थुंकीच्या नमुन्याच्या तपासणीसाठी विशिष्ट तीव्रतेचे फिनाइल वापरले जाते. हे फिनाइल तयार करून बाटलीबंद करून ठेवण्यात आले होते. वापरासाठी बाटलीचे बुच काढले असता, त्याचा संपर्क हवेशी आला. त्यामुळे रसायनाचा भडका उडाला. चौगुले यांच्या डोळ्यांना भाजले. शेजारीच असणाऱ्या अन्य दोघांच्या हातावरही जखमा झाल्या. कर्मचाऱ्यांनी तिघांनाही मिरजेत शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले.त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी दुर्घटनेची माहिती घेतली. दरम्यान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी बुधवारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना दिले.संघटनेने सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रयोगशाळा अपुऱ्या जागेत आहे. तेथे एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व हिंद लॅबचा एक कर्मचारी रक्ताच्या नमुन्याचे संकलन व तपासणीचे कामकाज करतो. सर्व कामे अपुऱ्या जागेत एकत्र होत असल्याने संसर्गाचा व दुर्घटनेचा धोका वाढतो. जिल्हा आरोग्य विभागाने पुरेशी साधनसामग्री व जागा देणे आवश्यक आहे. क्षयरोग तपासणीचे रसायनदेखील वरिष्ठ कार्यालयाकडूनच पुरविले जाणे आवश्यक आहे.

भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुर्घटनेची माहिती घेतली आहे. त्याच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलfireआग