कुपवाडमधील दाेन ठिकाणी चाेरी; १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:29+5:302021-07-05T04:17:29+5:30
कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमधील श्रीकांत लक्ष्मण दबडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६३ ...

कुपवाडमधील दाेन ठिकाणी चाेरी; १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल लंपास
कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमधील श्रीकांत लक्ष्मण दबडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. तर दुसऱ्या घटनेत कुपवाड महापालिका कार्यालयाजवळील कागद व्यवसाय कंपनीतील १५ हजार रुपयांचे लॅपटॉप व चार्जर चोरट्यांनी लंपास केला आहे. या दोन्ही घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशक्तीनगरमधील श्रीकांत दबडे कुटुंबासह घराला कुलूप लावून परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तिजोरीतील सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठन, दीड तोळ्याचा नेकलेस, चांदीचा करदोरा, ब्रेसलेट असा १ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज तसेच पॅनकार्ड, बँक पासबुक व इतर कागदपत्रे लंपास केलेली आहेत.
दुसऱ्या घटनेत कुपवाड महापालिका कार्यालयाजवळील लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या एका कागद कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कंपनीतील १५ हजार रुपयांचे लॅपटॉप व चार्जर असा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस तपास करीत आहेत.