पर्यटकांच्या विमानोड्डाणाला ‘ब्रेक’; सहली लांबणीवर; सुटीच्या मोसमातच ट्रॅव्हल एजन्सीजना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:49 IST2026-03-07T17:49:14+5:302026-03-07T17:49:34+5:30

दुबई, साैदी अरेबियासह विविध सहलींच्या नियोजनात बदल

Changes in planning for various trips including Dubai and Saudi Arabia, Travel agencies hit | पर्यटकांच्या विमानोड्डाणाला ‘ब्रेक’; सहली लांबणीवर; सुटीच्या मोसमातच ट्रॅव्हल एजन्सीजना फटका 

संग्रहित छाया

सांगली : सुटीच्या मोसमात नियोजित केलेल्या दुबईच्या सहलींना युद्धामुळे ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील सुमारे २५० लोकांनी दुबई, सौदी अरेबियाच्या नियोजित सहली लांबणीवर टाकल्या आहेत. आखाती देशांबरोबरच अन्य देशातील सहलींच्या बुकिंगलाही सध्या फारसा प्रतिसाद नसल्याने ट्रॅव्हल एजन्सी चालकांना आर्थिक फटका बसत आहे.

युद्धामुळे एकीकडे आयात-निर्यातीला ब्रेक लागला असतानाच आता पर्यटकांच्या नियोजनालाही फटका बसला आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा मोसम असतो. फेब्रुवारीअखेरीस बुकिंग करण्यात आलेल्या आखाती देशांच्या सहलींच्या नियोजनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. युद्धामुळे बहुतांश ट्रीप लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. युद्धाचा कालावधी वाढला तर या सहली रद्द होण्याचीही भीती आहे.

एजन्सी चालकांच्या मते, दरवर्षी सांगली जिल्ह्यातून दुबईला मोठ्या प्रमाणावर सहलींचे नियोजन केले जाते. यंदाही तसे बुकिंग झाले होते. मात्र, युद्ध सुरू होताच या सहलींच्या नियोजनात बदल केले जात आहेत. काही एजन्सी चालकांच्या मते, अन्य देशातील बुकिंगला प्रतिसाद आहे. तर काहींच्या मते, युद्धाच्या परिस्थितीमुळे परदेशातील अन्य ठिकाणच्या सहलींबाबतही पर्यटक सुरक्षेवरून साशंक आहेत.

वर्षभरात दोनदा फटका

ट्रॅव्हल एजन्सी चालकांना वर्षभरात दोन्ही सुटीच्या मोसमात फटका बसला. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या सहली रद्द झाल्या होत्या. देशांतर्गत पर्यटनाला फटका बसला होता. आता मार्च २०२६ मध्ये आखाती देशातील सहलींवर परिणाम झाला आहे.

आमच्याकडे दुबईसाठी ५ ग्रुपने बुकिंग केले होते. ते आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे यंदाच्या बुकिंगलाही फटका बसला आहे. मार्च महिन्यातील बुकिंगचे प्रमाण घटले आहे. -मुकुंद माने, ट्रॅव्हल एजन्सी चालक
 

सध्या ८ ते १० टक्के सहलींच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. दुबईला नियोजित असलेल्या सहली लांबणीवर टाकाव्या लागत आहेत. मागील वर्षी पर्यटनाच्या मोसमातच पहलगाम हल्ल्याचा फटका बसला होता. यंदा युद्धामुळे एजन्सी चालकांना धक्का बसला आहे. - मंगेश शहा, ट्रॅव्हल एजन्सी चालक

Web Title : युद्ध से पर्यटन उड़ानें रुकीं; ट्रैवल एजेंसियों पर असर।

Web Summary : युद्ध के कारण सांगली से दुबई की यात्राएँ रुकीं, जिससे ट्रैवल एजेंसियों पर असर पड़ा। सुरक्षा चिंताओं के कारण बुकिंग में गिरावट। कश्मीर की घटना के बाद एजेंसियों को नुकसान हुआ।

Web Title : War puts a stop on tourist flights; travel agencies affected.

Web Summary : War halts Dubai trips from Sangli, impacting travel agencies. Bookings decline due to safety concerns. Agencies face losses after previous Kashmir incident disrupted domestic tourism.