शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पूरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 3:19 PM

पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव , मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे भेट देवून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देपूरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणीग्रामस्थांशी साधला संवाद

सांगली : पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव , मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे भेट देवून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांचे समवेत आर. पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली, संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली हे होते.

या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय पथकाने पूरबाधीत गावातील ऊस, केळी, द्राक्ष, सोयाबिन, आदी पिकांची, पडझड झालेल्या घरांची, पाणी किती वाढले होते याची पाहणी करुन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पहाणी केली. सानुग्रह अनुदान मिळाले का, स्थलांतर कसे झाले आदी बाबतही त्यांनी विचारणा केली.सांगली येथे रेसिडेंसी क्लब येथे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले. तसेच शाळा, रस्ते, पशुधन नुकसानीबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती उद्या जिल्हाधिकारी दौलत देसाई देणार आहेत.या बैठकीला महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, कोल्हापूरचे मल्लीनाथ कलशेट्टी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली