सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या १४ फुटी ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त रविवारी सांगलीत जल्लोष दिसून आला. मिरजेतील मिशन हॉस्पिटलपासून सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भीमांगण परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीचे चौकाचौकांत पुष्पहार अर्पण करून तसेच फुलांची उधळण करून स्वागत केले.सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भीमांगण परिसरात सुभाषनगर येथे मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी बनवलेला १४ फुटी ब्रॉन्झ धातूचा जवळपास १६०० किलो वजनाचा पुतळा उभारला जाणार आहे. १४ एप्रिल ही आंबेडकरांची जयंती आणि १४ फुटी पुतळा असा योग साधला जाणार आहे. या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची अनेकांना उत्सुकता होती. मिरजेतील मिशन हॉस्पिटलपासून रात्री आठच्या सुमारास हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुतळा घेऊन रॅली निघाली. जोरदार घोषणाबाजी करत वाद्यांचा गजर करत रॅली सांगलीच्या दिशेने निघाली. सांगलीत येताना ठिकठिकाणी चौकात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. भीमगीतांच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला. महिलादेखील फेटे बांधून स्वागतासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसून आले. जेसीबीच्या साहाय्याने जागोजागी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पुष्पवृष्टी करून स्वागत केले. रात्री उशिरा बसस्थानकाजवळील भीमांगण परिसरात पुतळा आणल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्ष स्नेहल सावंत, सचिव बिरेंद्र थोरात तसेच रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे, विज्ञान माने, अनिल साबळे, सुरेश चौधरी, विकास कांबळे, चेतन गाडेंसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Summary : Sangli celebrated the arrival of Dr. Ambedkar's 14-foot bronze statue with a vibrant rally. The statue, West Maharashtra's largest, was welcomed with flowers and enthusiasm. It will be installed at Bhimangan near the central bus stand on April 14th, Ambedkar Jayanti.
Web Summary : सांगली में डॉ. अम्बेडकर की 14 फुट की कांस्य प्रतिमा के आगमन का भव्य स्वागत किया गया। पश्चिम महाराष्ट्र की सबसे बड़ी प्रतिमा का फूलों और उत्साह के साथ स्वागत हुआ। यह 14 अप्रैल को अम्बेडकर जयंती पर मध्यवर्ती बस स्टैंड के पास भीमांगन में स्थापित की जाएगी।