शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात-कोठडीत मारले, आंबोलीत जाळले--अनिकेत कोथळेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:35 IST

सांगली : पोलिस ठाण्यातील‘थर्ड डिग्री’त अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाने त्याचा मृतदेह विश्रामबाग परिसरातील रुग्णालयात नेल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देडॉक्टरची चौकशी : कामटेच्या सांगण्यावरून पोलिस ठाण्यातील फुटेज नष्टबहुतांश पोलिसांना सीआयडीने चौकशीसाठी पाचारण करुन कसून चौकशी

सांगली : पोलिस ठाण्यातील‘थर्ड डिग्री’त अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाने त्याचा मृतदेह विश्रामबाग परिसरातील रुग्णालयात नेल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णालयातील सीसीटीव्हीफुटेज सीआयडीने सोमवारी ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमधील अनिकेतच्या खुनावेळचे फुटेज कामटेच्या सांगण्यावरून नष्ट केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाने दिली आहे.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना लुटमारीच्या गुन्'ात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला ‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना डीबी रूममध्ये घडली होती. या रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात ही घटना चित्रीत झाली होती. प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेने शहरातील ओळखीच्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाला बोलावून घेतले होते. कामटेने सीसीटीव्हीमध्ये डाटा खूप झाला असून, तो नष्ट करायचा आहे, असे सांगितले. त्यानुसार या तंत्रज्ञाने मंगळवारी पहाटेपर्यंतचे सर्व फुटेज नष्ट केले. पण या तंत्रज्ञास कामटेने केलेल्या कृत्याची काहीच माहिती नव्हती. सीआयडीने चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर त्याला हा प्रकार समजला.

सीआयडीने त्याचा जबाब घेऊन सोडून दिले आहे.अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झाकीर पट्टेवाले यांनी बेकर मोबाईल गाडीचा चालक राहुल शिंगटे यास बोलावून घेतले. अनिकेत बेशुद्ध पडला असून, त्याला रुग्णालयात न्यायचे आहे, असे शिंगटेला सांगितले. शिंगटेने बेकर मोबाईल गाडी काढली. डीबी रूममधून अनिकेतचा मृतदेह काढून तो गाडीत घातला. प्रथम गाडी शासकीय रुग्णालयापर्यंत नेली. तिथे गेल्यानंतर कामटेने शिंगटेला हा प्रकार सांगितला. शासकीय रुग्णालयात गेलो तर अडचणीत येऊ, असा विचार करून त्यांनी विश्रामबाग परिसरातील खासगी रुग्णालयाकडे गाडी नेली. या रुग्णालयात प्रमुख डॉक्टर नव्हते. त्यांच्या मदतनीस डॉक्टरला कामटेने बाहेर बोलावून घेतले. डॉक्टरने पोलिस गाडीतच अनिकेतची तपासणी केली. डॉक्टरने अनिकेत मृत झाल्याचे सांगितले. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे प्रमाणपत्र दविश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.)ेण्यासासाठी कामटेने डॉक्टरला गळ घातली होती. परंतु या डॉक्टरने नकार दिला, अशी माहितीही चौकशीतून पुढे आली आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.आज न्यायालयात नेणारयुवराज कामटेसह सहाजणांच्या पोलिस कोठडीची मंगळवारी मुदत संपणार आहे. तपास अजून अपूर्ण असल्याने आणखी किमान तीन दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी न्यायालयात मागणी करणार असल्याचे सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. कामटेसह सर्वांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पण मूळ घटनेविषयी त्यांनी काहीही सांगितले नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले.पोलिसही साक्षीदारयुवराज कामटे आणि पथकाच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोलिस ठाण्यातून बाहेर काढताना ड्युटीवरील अनेक पोलिसांनी पाहिले आहे. यातील बहुतांश पोलिसांना सीआयडीने चौकशीसाठी पाचारण करुन कसून चौकशी केली आहे. यातील काहीजण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके रजेवर होते. त्यामुळे ठाण्याचा कार्यभार उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांच्याकडे होता. त्यांच्याकडेही सीआयडीने चौकशी केली.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMurderखून