शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक

By अविनाश कोळी | Updated: May 3, 2023 16:19 IST

कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल

सांगली : जंगली खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी करणार्‍या इम्रान अहमद मुलाणी (वय ४२ रा. मु.पो. अलोरे ता.चिपळूण जि. रत्नागिरी) व दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५ रा. चिंद्रवळे, ता. गुहागर जि. रत्नागिरी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली दोघांकडून ११ लाख ८७ हजाराचे खवले जप्त केले.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. सहायक निरीक्षक संदीप शिंदे व अंमलदारांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कुपवाड ते अहिल्यानगर रस्त्यावर शिवमुद्रा चौकात दोघेजण दुर्मिळ संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाने वन अधिकार्‍यासमवेत शिवमुद्रा चौकात सापळा लावला. दोघे संशयित आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून ठेवले. दोघांची झडती घेतली असता इम्रान मुलाजी याच्या पाठीवरील सॅकमध्ये एका गोणीमध्ये खवले मिळाले. जंगली खवल्या मांजराच्या अंगावरील खवले असून त्याच्या विक्रीसाठी आल्याचे दोघांनी सांगितले. खवल्याबाबत विचारणा केली असता गावाकडील शेतामध्ये मृत झालेल्या खवल्या मांजराचे असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाकडील मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनपाल सुधार महालिंग भोरे यांनी सदरचे खवले अतिशय दुर्मीळ संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असल्याचे सांगितले. खवल्याचे वजन ४ कि. ७५० ग्रॅम असून किंमत ११ लाख ८७ हजार ५०० रुपये इतकी आहे. दोघांविरुध्द कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदाळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील वनपाल तुषार भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस