शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

भाविकांवर जातीयवादी टिपणी, गिरनारवरील पंड्यांविरोधात कारवाईसाठी जैन संघटनेचे मोदींना साकडे

By अविनाश कोळी | Updated: December 3, 2022 18:48 IST

गुजरातच्या गिरनार पर्वतावरील भगवान नेमिनाथ यांच्या मोक्षस्थानी नियुक्त केलेले पंडे (स्थानिक पुजारी) भाविकांवर दहशतही निर्माण करीत आहेत

सांगली : गुजरातच्या गिरनार पर्वतावरील भगवान नेमिनाथ यांच्या मोक्षस्थानी नियुक्त केलेले पंडे (स्थानिक पुजारी) भाविकांवर जातीयवादी टिपणी करून दहशतही निर्माण करीत आहेत. त्यामुळे संबंधित पंड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जैन संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सदस्य सुरेश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले की, यासंदर्भातील निवेदन पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांना देण्यात आले आहे. गुजरातच्या जुनागडजवळील गिरनार पर्वत हिंदू व जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी दत्त देवस्थान तसेच जैन समाजाचे २२ वे तीर्थंकर श्री नेमिनाथ भगवान यांचे मोक्षस्थान आहे. त्यामुळे लाखो भाविक दररोज येथे हजारो किलोमीटर अंतर कापून येत असतात.भाविक श्रद्धेने याठिकाणी येत असताना येथील पंडे लोक त्यांच्याशी अनादर दाखवितात. दर्शन घेताना त्यांना झिडकारणे, मोठ्या आवाजात त्यांच्याशी उद्धटपणे वागणे, शिवीगाळ करणे अशा गोष्टी ते करतात. त्यामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे. याशिवाय नेमिनाथ भगवान यांच्या चौथ्या टोकाला असणाऱ्या श्रद्धास्थानी जैन बांधवांवर जाती-धर्मावरून टिपणी केली जाते.देवाच्या पवित्र स्थानी अशाप्रकारची भाषा, वागणूक व वातावरण अयोग्य व सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त जैन समाजाच्या भावना विचारात घेऊन संबंधित पंड्यांवर कारवाई करावी. दहशत निर्माण करणाऱ्यांना तिथून हटवावे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

शारीरिक कष्टापेक्षा मनाच्या वेदना असह्यपाटील म्हणाले की, गिरनार पर्वत चढताना भाविकांना हजारो पायऱ्या चढण्याचे कष्ट घ्यावे लागतात. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर त्यांना हे कष्ट जाणवत नाहीत, मात्र पंडे ज्या पद्धतीने भाविकांना दुखावत आहेत, त्या वेदना भाविकांना असह्य होत आहेत.

पंतप्रधानांकडून अपेक्षापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरनार पर्वत क्षेत्राचा विकास केला आहे. त्यामुळे या प्रश्नावरही ते दखल घेतील, अशी अपेक्षा आहे. नाथसंप्रदायाचे महंत असलेले योगी आदित्यनाथ यांनाही आम्ही निवेदन दिले आहे, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात