शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई

By घनशाम नवाथे | Published: April 17, 2024 6:33 PM

सांगलीवाडीत तिसरी कारवाई

सांगली : सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत स्थिर सर्वेक्षण पथक अर्थात एसएसटी पथकाने मोटारीतून वाहतूक केली जाणारी साडे दहा लाखाची रोकड जप्त केली. मोटार चालक जोतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत. या नाक्यावर २४ तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. सांगलीवाडी येथे एसएसटी पथक क्रमांक तीनचे प्रमुख निखिल मांगोरे व आचार संहिता कक्ष प्रमुख विनायक झाडे, सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे, फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलिस कर्मचारी निशांत मागाडे, विकी मोरे, वैशाली हटाळे यांचे पथक बुधवारी सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत होते.वाहनांची तपासणी सुरू असताना मोटार (एमएच ०९डीएम १८९९) अडवून वाहनाची झडती घेतली असता, चालक जोतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात १० लाख ५१ हजार २० रुपये इतकी रोकड मिळून आली. या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने आढळले. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रोकड दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आली आहे.चालक गोरे हा पुणे येथून आरग (ता. मिरज) येथे जात होता अशी माहिती मिळाली. निवडणूक आयोगाच्या व आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

सांगलीवाडीत तिसरी कारवाईसांगलीवाडीत ४१ किलो चांदीचे दागिने मागील आठवड्यात जप्त केले. त्यानंतर लगेचच सव्वा दोन लाखाची रोकड जप्त केली. बुधवारी दहा लाख ५१ हजाराची रोकड जप्त केली. या नाक्यावरील ही तिसरी कारवाई ठरली आहे. कारवाईबद्दल प्रशासनाकडून एसएसटी पथकाने कौतुक होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस