गिरगाव येथे १४ लाखाचा गांजा पकडला, उमदी पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 20:45 IST2023-11-25T20:43:07+5:302023-11-25T20:45:02+5:30
याप्रकरणी सिंकदर बगसू कोतवाल (वय ५०) अस्मान बगसू कोतवाल ( वय ५० रा कोतवाल वस्ती, गिरगाव ता.जत) या दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गिरगाव येथे १४ लाखाचा गांजा पकडला, उमदी पोलिसांची कारवाई, आरोपीला अटक
जत तालुक्यातील गिरगाव येथे कांद्याच्या शेतात १३ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा १३६ कि. ८६५ ग्रॅम गांजा उमदी पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. शनिवारी (दि.२५) सकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात केली. याप्रकरणी सिंकदर बगसू कोतवाल (वय ५०) अस्मान बगसू कोतवाल ( वय ५० रा कोतवाल वस्ती, गिरगाव ता.जत) या दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गिरगाव हद्दीतील गावापसून पूर्व भागातील कोतवाल वस्तीवर सिकंदर बगसू कोतवाल व उस्मान बगसू कोतवाल यांचे इंचगिरी रस्त्यावर शेत आहे. त्यांनी कांद्याच्या पिकात गांज्याच्या झाडांची लागवड केली आहे. याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व कर्मचारी यांनी कांद्याच्या पिकात सकाळी ७ वाजता धाड टाकली.
शेतात सुमारे ६ ते ७ फुट उंच असलेले १२७ गांजाचे हिरव्या रंगाचे ओलसर पानांची व उग्रवासाची झाडे होती. झाडे उपटून पाने, फांदी, खोडासह गांजाच्या हिरव्या झाडांचे अंदाजे वजन १३६ किलो ८६५ ग्रॅम इतके भरले.
आरोपी सिंकदर बगसू कोतवाल, अस्मान बगसू कोतवाल यांच्यावर उमदी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करीत आहेत.
उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोउपनि शिरीष शिंदे आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी,इंद्रजित गोदे, सोपान भंडे, नितीन खोंडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिरीष शिंदे करीत आहेत.