शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीच्या लोकनियुक्त सरपंचाचे पद रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

आटपाडी : तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना सरपंच पदावरून काढून टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे ...

आटपाडी : तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना सरपंच पदावरून काढून टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पाठविला आहे.

दिघंचीच्या ग्रामपंचायत सदस्या आशाराणी समाधान नळ यांनी सरपंच मोरे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

चौदावा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपट्टी निधी, बाजार पावत्या यामध्ये ग्रामपंचायत कारभारामध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मिरजेचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने दि. १३ सप्टेंबर २० रोजी दिघंची ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या समितीने दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी अहवाल सादर केला. त्यानंतर सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेस विद्यमान सरपंच मोरे हे जबाबदार आहेत. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. या सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९(१) नुसार कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे.