Burglars | Crime News कुपवाड येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या व भिलवडे खूनप्रकरणी फरारी दोघा आरोपींना अटक
Crime News कुपवाड येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या व भिलवडे खूनप्रकरणी फरारी दोघा आरोपींना अटक

ठळक मुद्दे‘एलसीबी’ची कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : कुपवाड येथे भरदिवसा घरफोडी करून चार तोळ्यांचे दागिने लांबविणाºया दोघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले. या टोळीक डून लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांत सागर शहाजी जावीर (वय १९ , रा. पाण्याच्या टाकीजवळ, अहिल्यानगर, सांगली) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चोरट्यांचेपोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पथक तयार करत घरफोड्या उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
एलसीबीचे पथक शनिवारी गस्तीवर असताना पथकातील आर्यन देशिंगकर यांना खबर मिळाली की, शहरातील सराफ बाजार परिसरात एक तरुण चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे दागिने मिळून आले.

पथकाने त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत कुपवाड येथील रोहिदास समाज मंदिर परिसरातील एका घरातून दिवसा चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून १ लाख ५० हजार ५०० रुपये किंमतीचे सुमारे चार तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. या चोरीची एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव, हेमंत ओमासे, संदीप गुरव, आर्यन देशिंगकर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.

 

  • भिलवडे खूनप्रकरणी फरारी दोघा आरोपींना अटक


मिरज : मिरजेतील सलीम भिलवडे याच्या खूनप्रकरणी फरारी महंमद शेख व अमन गोदड या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर रणजित गवळी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मिरजेतील भिकू कांबळे याच्या खून प्रकरणातील संशयित सलीम भिलवडे याचा दि. २ जानेवारी रोजी रात्री मिरज-मालगाव रोडवर कोयता व दगडाने ठेचून खून करण्यात आला. या खूनप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी मृत भिलवडेचे मित्र इजाज शेख व सुहेल नदाफ या दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत खुनाच्या कटात महंमद शेख, अमन गोदड व रणजित गवळी या तिघे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

महंमद शेख हा संशयित इजाज शेख याचा भाऊ आहे. पोलिसांनी रणजित गवळीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. मात्र पुन्हा पोलिसांनी मागणी केल्याने आरोपी रणजित गवळी यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खुनातील दोघे फरारी संशयित अमन गोदड व महंमद शेख या दोघांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.

 

Web Title: Burglars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.