शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे टॉवर सील

By admin | Updated: December 23, 2014 00:36 IST

पाणीपुरवठा तोडला : महापालिकेची कारवाई

सांगली : घरपट्टी विभागाने ४२ लाखांच्या थकबाकीपोटी आज (सोमवारी) स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाचा पाणीपुरवठा तोडला. कंपनीचे टॉवरही ‘सील’ केले. त्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांची दिवसभर कारवाई टाळण्यासाठी पळापळ सुरू होती. महापालिका आयुक्तांकडे त्यांनी दहा दिवसांची मुदत मागितली. दहा दिवसांच्या अटीवर महापालिकेने टॉवरचे ‘सील’ काढले व पाणीपुरवठाही सुरळीत केला. बीएसएनएलकडील ४२ लाखांच्या घरपट्टी थकबाकीसाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला. यासंदर्भात नोटिसाही बजावल्या होत्या. दोन वर्षांपासून कंपनीने घरपट्टी भरली नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढतच गेली. घरपट्टी विभागाने आज सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील टॉवर सील केले. याठिकाणचा पाणीपुरवठाही तोडण्यात आला. या कारवाईमुळे अधिकाऱ्यांची गोची झाली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी धावपळ केली. आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन दहा दिवसांत घरपट्टी जमा करण्याचे मान्य केले. आयुक्तांनी दहा दिवसांत सर्व पैसे जमा करण्याच्या अटीवर कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी ‘सील’ काढून पाणीपुरवठाही सुरळीत केला. घरपट्टी वसुलीसाठी दोनशे थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. आठवडाभरात काही मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षातील मागणी व जुनी थकबाकी मिळून घरपट्टी विभागाला ५० कोटी रुपयांची वसुली करायची आहे. (प्रतिनिधी)