शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’ धूळखात, जिल्ह्यातील तळीराम झोकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST

शरद जाधव लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाईसाठी असलेल्या ...

शरद जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाईसाठी असलेल्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या केसेस थांबल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही याची पडताळणी करणारे ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशीनचा वापर थांबल्याने तळीराम मात्र, सुसाट आहेत.

वाहतूक नियमांचे पालन व त्यासाठी वाहतूक शाखा कार्यरत असलीतरी वाहनचालकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे. सध्या सुरू असलेल्या वाहतुक सुरक्षा अभियानातून प्रशासनातर्फे याबाबत प्रबोधन केले जात आहे. मात्र, तरीही अनेकजण जिवाची पर्वा न करता वाहन चालवताना दिसत आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेकडे ब्रेथ अ‍ॅनालायाझर’ मशीनची सोय आहे. यात वाहनचालकांच्या शरीरातील अल्कोहलचे प्रमाण कळत असल्याने पोलिसांना कारवाई करणे सोपे जाते. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्याची तपासणी करून पुढील कारवाई होत असते.

ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनचा वापर वाहनधारकांच्या तोंडात घालून होत असल्याने कोरोना कालावधीत वापर करू नये अशा सूचना होत्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे अद्यापही ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर बंद आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असलातरी अद्यापही वापराबाबत कोणतेही निर्देश नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या केसेस थांबल्या आहेत.

चौकट

तळीरामांची चांदी

पूर्वी पोलिसांकडून होत असलेल्या नाकाबंदीवेळी सर्वाधिक तळीरामांवर कारवाई होत असे. या केसेसची संख्याही अधिक होती. आता मशीनच्या वापरालाच बंदी असल्याने तळीरामांना आवर कोण घालणार? हा सवाल कायम आहे.

कोट

शासनाच्या निर्देशानुसार ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर बंद असलातरी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर कारवाई सुरूच आहे. वाहनधारकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

प्रज्ञा देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सांगली