शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी निर्णायक लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 16:14 IST

सांगली : मराठा समाजातील ठराविक संपन्न मंडळी व साखर कारखानदारांवरून समाज सधन, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा कोणीही करू नये. ...

सांगली : मराठा समाजातील ठराविक संपन्न मंडळी व साखर कारखानदारांवरून समाज सधन, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा कोणीही करू नये. कारण आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये ९५ टक्के मराठा समाजातीलच शेतकरी आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढा उभारणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी बैठकीनंतर बनबरे यांच्यासह पदाधिकाºयांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.बनबरे म्हणाले की, शैक्षणिक व सामाजिक पातळीवर अजूनही समाज मागास असून, त्यासाठीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. जाती-जातीमध्ये सुरू असलेला संघर्ष मिटवून सर्व जाती, धर्म एक करण्याचे मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. सध्या राज्यभर राज्य मागासवर्गीय आयोगाचा दौरा सुरू असून, त्यांच्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी आहे. ओबीसीत आता समाविष्ट असलेल्या एकाही जातीवर अन्याय होऊ नये, हीच आमची आग्रही मागणी आहे. पन्नास टक्क्यांवर आरक्षण देण्यास अडचणी असल्या तरी, देशातीलच काही राज्यांनी ७५ टक्क्यांपर्यंत आरक्षणे दिली आहेत. तसेच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्टÑातही त्याप्रमाणे आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा होत राहील. आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव मधुकर मेहकरे, दिलीप चौधरी, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, राजेंद्रसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, नितीन चव्हाण, शाहीर पाटील, अमृतराव सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील, संजय देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भाजपकडून दिरंगाईबनबरे म्हणाले की, मराठा समाजाबरोबरच इतर समाजालाही आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. भाजपला मराठा समाजाला आरक्षण देण्याची अजिबात इच्छा नाही. आरक्षणासारखे भावनिक प्रश्न संपले तर त्यांना राजकारण करणे अवघड होणार असल्याने त्यांनी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.