शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोघे वाहून गेले

By admin | Updated: July 25, 2014 00:03 IST

दोन युवक जांभुळधाबा येथील रहिवासी : एकाचे प्राण वाचले, एक बेपत्ता

शेगाव : पूर्णा नदीत मिळणार्‍या नया अंदुरा ता.बाळापूर येथील पानखासच्या नाल्याला पूर असताना अतिधाडस करुन मोटारसायकलने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करणे दोन युवकांना महागात पडले. हे दोघे जण मोटारसायकलसह पाण्यात वाहून गेल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. यामधील एका युवकाने वाहताना बाभळीच्या झाडाला पकडल्याने तो वाचला. मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने कहर केल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे शेगाव -आकोट मार्ग बंद असून, या मार्गावरील सर्व वाहतूक निंबा फाटा येथे ठप्प झाली आहे. तर पूर्णा नदीत मिसळणार्‍या पानखासच्या नाल्यालाही पूर आहे. दरम्यान, नया अंदुरा जवळून वाहणार्‍या पानखासच्या नाल्यावर १0 ते १२ फूट पाणी वाहत असून, या पुरातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा जि.बुलडाणा येथील गोपाल शिवराम पांडे (वय २८) व त्याचा मित्र उमेश ईश्‍वर मुरेकर (वय २२) हे आपल्या मोटारसायकल क्र .एम.एच.२८ -९९९५ सह पुरात वाहून गेले. यामध्ये गोपाल पांडे याने बाभळीच्या झाडाला पकडल्याने दैव बलवत्तर म्हणून तो वाचला; मात्र उमेश मुरेकर हा अद्यापही बेपत्ता आहे. दोन्ही युवक हे मुंडगाव ता.अकोट येथे जाण्यासाठी निघाले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके, ठाणेदार इंगळे हे घटनास्थळावर दाखल झाले. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यात येत आहे; मात्र वृत्त लिहिपर्यंत शोध लागला नव्हता.