सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी; दोन मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 12:55 IST2021-09-09T12:45:21+5:302021-09-09T12:55:44+5:30

स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन सभा झाली.

BJP's Niranjan Avati as Sangli Municipal Corporation Standing Committee Chairman; Won by two votes | सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी; दोन मतांनी विजय

सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे निरंजन आवटी; दोन मतांनी विजय

सांगली : गेली आठ दिवस फोडाफोडी, कुरघोड्यांनी रंगलेल्या सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीत सभापतीपद राखण्यात भाजपला यश आले. भाजपचे निरंजन आवटी यांनी काँग्रेसच्या फिरोज पठाण यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. 

स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. आवटी व काँग्रेसचे फिरोज पठाण या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. कोणीच अर्ज माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यावेळी आवटी यांना ९ तर पठाण यांना ७ मते पडली. आवटी यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर आवटी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

Web Title: BJP's Niranjan Avati as Sangli Municipal Corporation Standing Committee Chairman; Won by two votes