शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

भाजपचे नेते म्हणतात...जयंत पाटील यांच्याशी मित्रत्वाचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 3:02 PM

politicas, bjp, ncp, Jayant Patil, Muncipal Corporation, Sanglinews महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांच्याशी प्रेमाचे, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा फायदा शहराच्या विकासासाठी करून घेऊ, त्यांना लवकरच महापालिकेत बैठकीसाठी निमंत्रण देणार असल्याचे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी बुधवारी स्पष्ट केले.

ठळक मुद्देभाजपचे नेते म्हणतात...जयंत पाटील यांच्याशी मित्रत्वाचे संबंध महापालिकेत बैठकीसाठी निमंत्रण देणार : शेखर इनामदार

सांगली : महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांच्याशी प्रेमाचे, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा फायदा शहराच्या विकासासाठी करून घेऊ, त्यांना लवकरच महापालिकेत बैठकीसाठी निमंत्रण देणार असल्याचे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी बुधवारी स्पष्ट केले.मिरजेतील एका कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांचे आपल्यावर विशेष प्रेम असल्याचे जाहीर केले होते. यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी व भाजप एकत्र येणार, पुन्हा जयंत जनता पार्टी (जेजेपी)चा प्रयोग होणार अशी चचा रंगली होती. यासंदर्भात इनामदार यांना विचारता त्यांनीही जयंत पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कबुली दिली.ते म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी बारा वर्षापासून संबध आहे. महाआघाडीच्या सत्ताकाळात आम्ही एकत्र काम केले आहे. आमच्यातील मित्रत्वाचे संबंध शहराच्या विकासाआड येणार नाही. जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महापालिकेचे काही प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांची मदत घेऊ.

महापूर, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यांना महापालकेत निमंत्रीत करून शासनाकडील प्रलंबीत कामांचा आढावा व आर्थिक अडचणींबाबत चर्चा करणार असल्याचे इनामदार आहे.राजकीय भूमिका वेगळ्याजयंत पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी आमच्या पक्षीय व राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. महाआघाडीच्यावेळी राजकीय संदर्भ वेगळे होते. आता त्यात बदल झाला आहे. विकासकामात आम्ही राजकारण आणत नाही. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, याच भूमिकेतून आम्ही काम करतो. यात काही गैर नाही, असेही इनामदार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा