शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा नियोजनमध्ये भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:24 IST

अजितदादांच्या टेबलवर फाइल

सांगली : जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपचे वर्चस्व असून, राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची सदस्य संख्या मिळाली आहे. शिवसेनेला कमी सदस्य संख्या मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील घटक पक्षांनाही ताकदीप्रमाणे स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे.राज्यात रखडलेली नियोजन समितीचे सदस्य निश्चित करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. नवीन यादीतील नावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केली असून, ही यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. जिल्हा नियोजन मंडळाच्या यादीमध्ये शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या एकमेव नावाचा समावेश आहे.भाजपमधील आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी अध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे चार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील व प्रा. पद्माकर जगदाळे या दोघांचा समावेश आहे. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि रयत क्रांती संघटनेचे अमोल पाटील यांचाही यादीत समावेश आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने ही यादी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीला शासनाची मंजुरी येत्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता असून, नवीन नियोजन मंडळाची बैठक दि. १४ अथवा १६ जून रोजी बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरच सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.सांगली नियोजन मंडळाची सदस्य संख्या ४० असून, यांपैकी ३२ सदस्य जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांमधून निवडण्यात येतात. मात्र, या निवडणुकाच झाल्या नसल्याने निवडणूक होईपर्यंत या जागा रिक्त राहणार आहेत. आमदार, खासदार हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध सदस्य असून, पालकमंत्री अध्यक्ष आहेत, तर जिल्हाधिकारी हे नियोजन मंडळाचे सदस्य सचिव आहेत.

अजितदादांच्या टेबलवर फाइलजिल्हा नियोजन समिती सदस्यांची यादी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या टेबलवर आहे. अन्य पक्षांशी या समिती सदस्यांच्या यादीतील नावांबाबत चर्चा करून काही बदलही होऊ शकतो. पण, फारसा फरक होणार नाही, असेही खात्रीशीर सुत्रांनी सांगितले.