शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:05 IST

कार्यकर्ते मात्र संभ्रमात

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभेची हवा पलटू लागली आहे. मतदारसंघ शिंदेसेनेसाठीच असताना भाजपने आपला उमेदवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष कमळाला सोडून आता घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे इस्लामपूर मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे समजल्याने शिंदेसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत.राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरीसुद्धा महायुतीकडून उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. इस्लामपूर मतदारसंघ महायुतीत शिवसेनेसाठी सोडला जाताे, असा अलिखित नियम असल्याने शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि इस्लामपूर मतदारसंघाचे शिवसेना निवडणूक प्रमुख गौरव नायकवडी यांनी उमेदवारीच्या निर्णयाचा चेंडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलला होता.इस्लामपूर मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला आहे. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही, म्हणूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना कमळाऐवजी घड्याळ बांधून तुतारीला आव्हान देण्याची खेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे. निशिकांत पाटील यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला.

इस्लामपूर नगरपालिकेत आमची ताकद आहे. त्यामुळे मतदारसंघात आमचे नेते आनंदराव पवार हेच उमेदवार असतील. आमचा विचार केला नाही, तर वेळ येईल तशी भूमिका मांडू. - सागर मलगुंडे, तालुकाध्यक्ष, शिंदेसेना 

आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची बांधणी इस्लामपूर मतदारसंघात सुरू आहे. मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे गेला आहे. महायुतीतून उमेदवार शोधमोहीम सुरू आहे. सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. - केदार पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (अजित पवार गट)

महायुतीतील सर्व नेत्यांचा निर्णय होईल. हा निर्णय सर्व पक्षातील जबाबदारी मानून एकासएक लढती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली तरच विरोधकांचा सुपडासाप होईल. - प्रसाद पाटील, निमंत्रक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप

टॅग्स :Sangliसांगलीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार