शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या गळाला

By admin | Updated: November 16, 2016 23:24 IST

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीच्या बैठका सुरू; राजकीय हालचाली गतिमान

 सांगली : विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १९ नोव्हेंबररोजी मतदान होत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसच्या गळाला भाजपचे सांगली जिल्ह्यातील सहा नगरसेवक लागल्याची चर्चा आहे. आणखी काही नगरसेवक खेचण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसअंतर्गत वाद मिटल्याने राष्ट्रवादी सतर्क झाली असून सांगली, सातारा जिल्ह्यात बुधवारी मतदारांच्या बैठका झाल्या. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होत आहे. काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे मैदानात आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने आणि सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार मोहनराव गुलाबराव कदम यांचेही अर्ज आहेत. मात्र बंडखोर गटाने मंगळवारी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आता राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. मतदारांच्या भेटीगाठीसाठी आता दोनच दिवस शिल्लक असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे. पायाला भिंगरी लावून दोन्ही उमेदवार व पक्षाचे नेते सांगली आणि सातारा जिल्ह्यात मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत. भाजपने अद्याप पक्षीयस्तरावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे त्यांच्या नगरसेवकांवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा डोळा आहे. काँग्रेसच्या गळाला भाजपचे जिल्ह्यातील सहा सदस्य लागले असून आणखी काही सदस्यही त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही भाजपच्या सदस्यांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेसअंतर्गत बंडखोरीला पूर्णविराम मिळाल्याने राष्ट्रवादी सतर्क झाली असून त्यांनी राष्ट्रवादीच्या मतांसह अतिरिक्त मतांसाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारपासून मतदारांच्या भेटीगाठीवर, बैठकांवर जोर दिला आहे. (प्रतिनिधी) १९ रोजी मतदान : चार ठिकाणी सोय सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी खानापूर भाग विटा यांचे कार्यालय, तहसील कार्यालय इस्लामपूर, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (अल्पबचत हॉल) व तहसील कार्यालय जत या चार मतदान केंद्रांवर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. नेत्यांची कसरत दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांना एकाचवेळी विधानपरिषद आणि स्थानिक पातळीवर नगरपालिका निवडणूक राजकारणात लक्ष घालावे लागत असल्याने, त्यांची दोन्ही बाजूंनी कसरत सुरू आहे.