शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
3
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
4
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
5
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
6
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
7
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
8
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
9
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
10
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
11
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
12
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
13
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
14
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
15
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
16
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
17
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
18
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
19
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
20
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”

Sangli Crime: अलिशान वाहनातून येऊन केल्या चोऱ्या, बड्या भंगार व्यावसायिकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:43 IST

डिव्हीआरमुळे सापडले धागेदोरे, ५ लाखांचा माल जप्त

शिराळा : दहा लाखांच्या अलिशान वाहनातून येत एका बड्या भंगार व्यावसायिकाने मांगले (ता. शिराळा) येथे तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उजेडात आला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाखाचे चोरीतील साहित्य जप्त केले आहे. याचपद्धतीने त्याने अनेकठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.हंबीरराव ऊर्फ अमित सावळा गोसावी (वय ४२, रा. गोसावी वस्ती कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी प्रकरणातील दिपक उर्फ लंगड्या गोसावी, अनिल उर्फ बारक्या गोसावी (दोन्ही रा. तासगाव, जि. सांगली ) हे दोघे अद्याप फरार आहेत. या संशयितांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले दोन गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत.मांगले येथे चोरट्यांनी गुरूवारी १ मे रोजी रात्री पावणे दहा ते शुक्रवारी २ मे रोजी सकाळी आठपर्यंत चोरी केली होती. एक परमिट रूम, रूद्राक्ष मल्टीपर्पझ हॉल तसेच दत्तात्रय यादव यांच्या घरात त्यांनी चोरी केली होती.पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमर जाधव व पोलिस नाईक उमेश शेटे यांनी गोपनीय, तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने तपास करून हंबीरराव गोसावी या संशयित आरोपीस कोडोली येथे राहत्या घरातून अटक केली.

माल केला जप्तचोरीसाठी वापरलेले वाहन तसेच ९ हजार ८८५ हजारांची दारू, १५ हजारांचा ॲम्प्लिफायर, ५ हजाराची ईको मशीन, माईक, मोबाइल, १५ हजार रुपयांचा डी.व्ही. आर, ३ हजाराची वायर असा माल जप्त केला.

तो निघाला बडा व्यावसायिकसंशयित हंबीरराव गोसावी हा उच्चभ्रू घराण्यातील बडा भंगार व्यवसायिक आहे. त्याच्या घरातून चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला. त्यास अलोरे (ता. चिपळूण) येथे मार्च २०२४ मध्ये महावितरण कार्यालयातील चोरी प्रकरणात दोन वेळा अटक करण्यात आली होती.

डिव्हीआरमुळे सापडले धागेदोरेपोलिसांनी जप्त केलेल्या दोन सीसीटीव्ही डिव्हीआर हे २२ मार्च व २३ एप्रिल रोजीचे असून मंगरायाची वाडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील चोरीतील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याठिकाणी एल. पी. जी. बॉटलिंग प्लॅन्टमध्ये दोनवेळा चोरी करून तीन लाखाचे १३ हजार ११० सिलिंडरचे पितळी व्हॉल्व लंपास केले होते.

गॅस बर्नर, पितळी घागरीमुळे शोधमांगले येथील चोरीत कोणतेही धागेदोरे नव्हते. मात्र, गॅस बर्नर व पितळी घागरी चोरीस गेल्या होत्या. यावरून चोरटा भंगार व्यावसायिक असावा, असा अंदाज बांधून या चोरीचा पोलिसांनी छडा लावला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस