Sangli: प्रेमामध्ये फसली, युवतीने जीवनयात्राच संपवली; संशयितावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:28 IST2024-03-22T18:26:20+5:302024-03-22T18:28:12+5:30
कडेगाव : कडेगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Sangli: प्रेमामध्ये फसली, युवतीने जीवनयात्राच संपवली; संशयितावर गुन्हा
कडेगाव : कडेगाव तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित तेजस पवार (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, कडेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस संशयित तेजसने जानेवारी २०२४ मध्ये फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिची फसवणूक केली. फसवले गेल्याचे लक्षात येताच युवतीला धक्का बसला. तिने दि. २० रोजी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास राहत्या घरातील अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. युवतीच्या वडिलांनी कडेगाव पोलिस ठाण्यात संशयित तेजस पवार याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तेजसवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले.