शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा शहरात कोरोनाबाबत जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST

ओळ : आष्टा शहरात कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तहसीलदार डॉ. दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस ...

ओळ : आष्टा शहरात कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तहसीलदार डॉ. दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सिद, संजय सनदी सहभागी झाले हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आष्टा पोलीस ठाण्यात शहरातील विविध मंडळे, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहरातून कोरोनाबाबत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

यावेळी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, श्री राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती हे उत्सव साजरे करताना सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, गर्दी करू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे, सांगली जिल्ह्यात दि. ५ ते ३० अखेर संचारबंदी आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले.

काेराेनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा. यासाठी अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, आष्टा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सिद, संजय सनदी, यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, महसूल कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी एस. टी. स्टँड चौकातून शहरात रॅली काढून जनजागृती केली.