लोकमत इम्पॅक्ट: अखेर कृष्णा, भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:55 IST2025-06-25T17:54:54+5:302025-06-25T17:55:50+5:30

जुन्या टेंडर करारास मुदतवाढ करून यंत्रणा सुरू करण्यास मंजुरी

Automatic rain gauge system launched in Krishna, Bhima valleys in sangli | लोकमत इम्पॅक्ट: अखेर कृष्णा, भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा सुरू!

लोकमत इम्पॅक्ट: अखेर कृष्णा, भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा सुरू!

शिराळा (जि.सांगली) : कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर शासन खडबडून जागे झाले असून, पुणे येथे तातडीने बैठक घेण्यात आली. शासनस्तरावर जुन्या टेंडर करारास मुदतवाढ करून ही व्यवस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आणि काही तासांतच ही यंत्रणा सुरू झाली.

या खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली होती. यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होत नव्हती. ही यंत्रणा अद्यापच बंद असल्याने आपत्ती व्यवस्थापन कसे करणार? असा प्रश्न पडला होता.

वाचा - कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे?

ही यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षांचा करार दि. ११ जूनला संपल्याने, तसेच मंत्रालयातून नवीन करारास अद्याप मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली होती. सोमवार, दि. २३ रोजी याबाबत बैठक होऊन जुन्या टेंडर करारास या पावसाळ्याअखेर मुदतवाढ करूनही व्यवस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शासनामार्फत जुन्या टेंडर करारास पावसाळ्यामार्फत मुदतवाढ करून ही व्यवस्था लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहिती संकलित करावी, असे संबंधित ठेकेदारांना कळविले आहे. संबंधित ठेकेदारांनी ही यंत्रणा सुरू केली आहे. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान विभाग, सांगली.

Web Title: Automatic rain gauge system launched in Krishna, Bhima valleys in sangli