चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला, पतीवर गुन्हा दाखल; सांगलीतील घटना

By शरद जाधव | Updated: December 6, 2023 19:03 IST2023-12-06T18:55:41+5:302023-12-06T19:03:11+5:30

लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

Attempted murder of wife due to suspicion of character, case filed against husband in Sangli | चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला, पतीवर गुन्हा दाखल; सांगलीतील घटना

चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला, पतीवर गुन्हा दाखल; सांगलीतील घटना

सांगली : शहरातील गावभाग परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमित अशोक घोडावत (वय ३७, रा. खिलारेवाडा, गावभाग, सांगली ) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमितची पत्नी पूनम यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सुमित हा पत्नीसह गावभागातील खिलारेवाडा येथे राहण्यास आहे. मागील काही दिवसांपासून मात्र, संशयित सुमित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत होता. फिर्यादी पूनम या घरातील बेडरूममध्ये झोपल्या असता संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नायलॉनच्या दोरीने पूनम यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

परंतु यावेळी झालेल्या झटापटीत पूनम यांनी स्वत:ची सुटका करून घेत याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित सुमित याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट पाहणी करत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

Web Title: Attempted murder of wife due to suspicion of character, case filed against husband in Sangli