शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला

By admin | Updated: December 25, 2016 23:56 IST

वांगीतील घटना : मोटारीवर ट्रॅक्टर घातला

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे वाळूचोरी रोखण्यासाठी गेलेले कडेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विलास भिसे, अव्वल लिपिक जयवंत लाड व अव्वल कारकून यांच्या मोटारीवर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक शेखर नाथाजी मोहिते (रा. वांगी) याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरही जप्त केला आहे. नायब तहसीलदार विलास भिसे व अव्वल लिपिक जयवंत लाड हे मोटारीतून (एमएच १४ बीके १०५४) वांगी परिसरातील वाळूचोरी रोखण्यासाठी वांगी-शेळकबाव रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी येरळा पात्रातून वाळू भरून येणारा ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ३०३०) त्यांना दिसला. भिसे यांनी या ट्रॅक्टरचा चालक शेखर नाथाजी मोहिते यास थांबविले. महसूलच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर पकडल्याचे लक्षात येताच शेखर याने ‘तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ द्या’, असे म्हणत ट्रॅक्टर चालू करून अधिकाऱ्यांच्या मोटारीवर ट्रॅक्टर घालून तेथून ट्रॅक्टरसह पलायन केले. भिसे व लाड यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला; पण ट्रॅक्टर शिवणी (ता. कडेगाव) येथे रस्त्यालगत घरासाठी पाडण्यात आलेल्या चरीत अडकला. ट्रॅक्टर चरीतून निघणार नाही हे लक्षात येताच चालक मोहिते पळून गेला. भिसे यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत जाऊन तक्रार दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोलवणकर यांनी ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून मालकाची माहिती घेतली. त्यावेळी हा ट्रॅक्टर कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील आनंदा यशवंत नलवडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. नलवडे यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती घेतली. नलवडे यांनी हा ट्रॅक्टर वांगीतील शेखर मोहिते यांच्याकडे असल्याचे सांगितले. रविवारी चालक शेखर मोहिते यास अटक केली. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर जप्त केला आहे. (वार्ताहर)