आटपाडीत सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:27+5:302021-02-05T07:25:27+5:30

आटपाडी येथे फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता सत्यशोधिका मीनल ...

Atpadi truth-seeking wedding ceremony in excitement | आटपाडीत सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात

आटपाडीत सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात

आटपाडी येथे फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता सत्यशोधिका मीनल आबासाहेब सागर यांचा अकलूज येथील आकाश हनुमंत राऊत यांच्याशी सत्यशोधक विवाह पार पडला.

फौंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत हा विवाह लावला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे आणि हनुमंत टिळेकर यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे गायन केले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, गोपीनाथ लोखंडे, सावता पुसावळे, उद्योजक शंकरराव लिंगे व रघुनाथ ढोक यांचा सत्कार झाला. आबा सागर व रोहित टिळेकर यांनी स्वागत केले.

या विवाह सोहळ्यास आमदार अनिल बाबर, रावबहादूर नारायण, गोपीनाथ लोखंडे, ॲड. सुभाष पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर, लेखक ॲड. के. डी. शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, स्वाती सागर, शिवाजी पाटील, भारत पाटील उपस्थित होते.

फोटो-०२आटपाडी१

Web Title: Atpadi truth-seeking wedding ceremony in excitement