शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 11:49 IST

Ashadhi Ekadashi 2025 : रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील चिमुकल्याने तुळशीच्या पानावर विठूरायाचे चित्र साकारले.

रेठरे धरण: लिव्हरला सूज, हाताला सलाईन रुग्णालयात उपचार सुरू असताना देखील इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आरव अरविंद कोळी याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाचे आकर्षक चित्र रेखाटले. अर्ध्या तासात त्याने विठ्ठलाचे चित्र साकारले.

आरवच्या लिव्हरला सूज आल्याने तो इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने आपल्या वडिलांना विठ्ठलाचे चित्र काढणार असल्याचा आग्रह धरला होता. आरवने फक्त २.५ सेमी x ३ सेमी आकाराच्या तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. यासाठी त्याला अर्ध्या तासाचा कालावधी लागला. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलावरची भक्ती आणि चित्रकलेची आवड यांचा सुंदर संगम आरवने या कृतीतून साधला आहे. लहान व नाजूक पानावर इतक्या सुंदर आणि सूक्ष्म रेखाटन करणे ही कौशल्याची बाब असून, आरवच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडील अरविंद कोळी सर हे चित्रकलेचे शिक्षक असलेने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आरवने चित्रकलेत प्राविण्य मिळविले आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र