आसदचे श्रीकांत जाधव हनुमान दिब्बा मनाली मोहिमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:54+5:302021-04-19T04:23:54+5:30

फोटो ओळ : आसद (ता. कडेगाव) येथे श्रीकांत जाधव यांना हनुमान दिब्बा मनाली मोहिमेसाठी आमदार अरुण लाड व शरद ...

Asad's Shrikant Jadhav Hanuman Dibba on Manali expedition | आसदचे श्रीकांत जाधव हनुमान दिब्बा मनाली मोहिमेवर

आसदचे श्रीकांत जाधव हनुमान दिब्बा मनाली मोहिमेवर

फोटो ओळ :

आसद (ता. कडेगाव) येथे श्रीकांत जाधव यांना हनुमान दिब्बा मनाली मोहिमेसाठी आमदार अरुण लाड व शरद लाड यांनी तिरंगा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

देवराष्ट्रे : आसद (ता. कडेगाव) येथील श्रीकांत जाधव यांनी दक्षिण आफ़्रिकेमधील किलीमांजारोच्या केलेल्या यशस्वी मोहिमेनंतर ते या महिन्यात हनुमान दिब्बा मनाली येथे चढ़ाई करणार आहेत. समुद्रसपाटीपासून ५९३२ मीटर उंची असणारे हे उंच शिखरांपैकी एक आहे. या मोहिमेसाठी आमदार अरुण लाड व शरद लाड यांनी तिरंगा भेट देऊन जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अरुण लाड म्हणाले, तरुणांना राजकारण सोडूनही अनेक क्षेत्रांत काम करण्याच्या व नाव कमावण्याच्या संधी आहेत. अशा संधी शोधून ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले पाहिजे. श्रीकांत जाधव यांचा आदर्श तरुणांनी घेऊन वाटचाल करावी.

या मोहिमेमध्ये श्रीकांत जाधव यांच्यासोबत एव्हरेस्ट वीर रफीक शेख हे सहभागी आहेत. यासाठी त्यांना फिनोलेक्स कंपनीचे सर्वेसर्वा प्रकाश छाब्रिया, रितुजी छाब्रिया, तुषार जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

चौकट

यशस्वी मोहिमा...

श्रीकांत जाधव यांनी आजपर्यंत हिमालय व सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक लहान-मोठ्या मोहिमांबरोबर एव्हरेस्ट बेस कँप्सचा यशस्वी ट्रॅक कमी वेळात पूर्ण केला, तसेच गतवर्षी माऊंट किलीमांजारो मोहीमही यशस्वी केली आहे.

Web Title: Asad's Shrikant Jadhav Hanuman Dibba on Manali expedition