शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमध्ये मिळणार ड्रोन, एआयचे शिक्षण; नव्या सहा अभ्यासक्रमांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:24 IST

विजेवरील वाहनांचे व्यवस्थापन; सोलर तंत्रज्ञ यांचा समावेश

सांगली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रमही सुरू होणार आहे. बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एआयचा अंगीकार करण्यात आला आहे. यासह सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.विद्युत वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

आयटीआयमध्ये सध्याचे सर्व अभ्यासक्रम पारंपरिकच आहेत. वेल्डर, फिटर, रेफ्रिजरेशन, मोटर मेकॅनिक, वायरमन आदी शिक्षणक्रम वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारही मिळत आहे. मात्र, बदलत्या काळात सामाजिक व्यवहारात अनेक आधुनिक तंत्रे आली, तरी त्याचे शिक्षण मात्र आयटीआयमध्ये मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन नव्या सहा अभ्यासक्रमांची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.बाजारात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा जमाना सुरू झाला आहे. त्यांचे उत्पादन, देखभाल व दुरुस्तीसाठी तंत्रज्ञांची गरज आहे. हे लक्षात घेऊन विद्युत वाहन व्यवस्थापन शिक्षणक्रम सुरू केला आहे. विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. त्याला सुसंगत ड्रोन तंत्रज्ञान हा अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. त्याशिवाय सोलरचा वाढता वापर व भविष्यातील प्रचंड विस्तार लक्षात घेऊन सोलर तंत्रज्ञ शिक्षणक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. थ्रीडी प्रिंटिंग आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स हे अभ्यासक्रमदेखील विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेत समावेश नाहीसांगली जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत सध्या नव्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सांगली आयटीआयमध्ये २५ विविध शिक्षणक्रमांचा समावेश आहे. नव्या काळाशी सुसंगत कॉस्माटोलॉजी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोगामिंग हे शिक्षणक्रम वगळता उर्वरित सर्व शिक्षणक्रम पारंपरिकच आहेत. आता तेथेही नवे कालसुसंगत शिक्षणक्रम सुरू होणार आहेत. मात्र, प्रवेश अर्जामध्ये नव्या सहा शिक्षणक्रमांचा उल्लेख सध्या तरी दिसत नाही.

टॅग्स :Sangliसांगलीiti collegeआयटीआय कॉलेजArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सStudentविद्यार्थी