तलवारी घेऊन फिरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:22+5:302021-02-08T04:23:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज शहरात पोत्यामध्ये घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...

Arrested for carrying a sword | तलवारी घेऊन फिरणाऱ्यास अटक

तलवारी घेऊन फिरणाऱ्यास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज शहरात पोत्यामध्ये घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संतोष आनंदा पाटील (वय ३७, रा. इदगाहनगर, मिरज) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायासह शस्त्र तस्करीवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित संतोष पाटील हा इदगाह चौक ते शंभर फुटी रस्त्यावरील कारंजाजवळ पोत्यामध्ये घातक शस्त्र घेऊन थांबला आहे. त्याच्याकडे तीन तलवारी मिळून आल्या असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुलदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Arrested for carrying a sword