Local Body Election: छाननीमध्ये सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिकेतील ५१८ इच्छुकांचे अर्ज अवैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:42 IST2025-11-19T19:41:27+5:302025-11-19T19:42:15+5:30
Local Body Election: नगरसेवकपदाचे ४८१, तर नगराध्यक्षपदाचे ३७ अर्ज अवैध

Local Body Election: छाननीमध्ये सांगली जिल्ह्यातील आठ नगरपालिकेतील ५१८ इच्छुकांचे अर्ज अवैध
सांगली : जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि आटपाडी, शिराळा नगरपंचायतींमधील नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी एक हजार ६७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
यापैकी मंगळवारी छाननीमध्ये ४८१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या छाननीमध्ये दिग्गज इच्छुकांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांना निवडणुकीपासून बाजूला थांबवे लागणार आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना बुधवार, १९ ते २१ या काळात उमेदवारी मागे घेण्याची मुदत राहील, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. दि. २१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमदेवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
छाननीत अवैध झालेले अर्ज
नगरपालिका / सदस्यांचे अवैध अर्ज / नगराध्यक्षपदाचे अवैध अर्ज
- उरुण-ईश्वरपूर / ८६ /४
- विटा /९९/०८
- आष्टा /२४/०१
- जत /३१/०२
- पलूस /७४/०३
- शिराळा /६७/०३
- आटपाडी /४२/१०
- तासगाव /५८/०७