शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिकेच्या धर्तीवर मतदारराजाला आवाहन

By admin | Updated: September 17, 2014 23:04 IST

यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला

तासगाव : लोकशाहीने तमाम भारतीयांना मतदानाचा समान अधिकार प्राप्त करून दिला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, यासाठी आता प्रशासनानेही कंबर कसली आहे. लग्नपत्रिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली आवाहन पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. एव्हाना ते प्रयत्न सुरूही झाले आहेत. परंतु निवडणूक, मतदानाचा हक्क व लोकशाही तळागाळात पोहोचली पाहिजे, यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला होता. लोकांनी मतदान केले पाहिजे, हा त्यामागचा हेतू सुस्पष्ट आहे.तासगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर सध्या एक पत्रिका झळकत आहे. इमारतीत जाताना सामान्य माणूस ही पत्रिका वाचल्याशिवाय पुढे जात नाही. ही पत्रिका आहे, १५ आॅक्टोबरच्या मुहूर्ताची. या मंगलप्रसंगी मतदान करून निवडणूक कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे. आपापल्या गावातील मतदान केंद्र हे स्थळ आहे. विशेष म्हणजे ‘आहेर स्वीकारू नये’ची टीप या पत्रिकेत आवर्जून घालण्यात आली आहे. (वार्ताहर)