शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये फिरणाऱ्या ११६ नागरिकांची अँटिजेन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

कुपवाड : शहरातील मुख्य कुपवाड विकास सोसायटी चौकात विनाकारण फिरणाऱ्या ११६ नागरिकांची गुरुवारी अँटिजेन टेस्ट करण्यात आली. ...

कुपवाड : शहरातील मुख्य कुपवाड विकास सोसायटी चौकात विनाकारण फिरणाऱ्या ११६ नागरिकांची गुरुवारी अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या तपासणीत तीन नागरिक पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.

महापालिका आणि कुपवाड पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई केली. सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी मयूर औंधकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरामधील ११६ नागरिकांची गुरुवारी अँटिजेन टेस्ट केली. या तपासणीमध्ये तीन नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून बाकीचे दोघे ग्रामीण भागातील असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

महापालिका हद्दीतील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना होम आयसोलेशन केले आहे. महापालिका आणि कुपवाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकामध्ये सहायक आयुक्त गायकवाड यांच्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, डॉ. मयूर औधकर, डॉ अंजली धुमाळ आदींसह आरोग्य सेवकांनी सहभाग घेतला होता.

चौकट

आरोग्य विभागाचे फिरते पथक तयार

महापालिका आरोग्य विभाग आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फिरते पथक तयार केले जाणार आहे. हे पथक शहर परिसरात फिरणार आहे. या पथकाकडून रस्त्यावर व चौकात विनाकारण बसलेल्यांची जागेवरच अँटिजेन तपासणी करणार आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर निश्चितपणे आळा बसेल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.