Sangli: अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी निश्चित, मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:43 IST2025-07-16T19:43:32+5:302025-07-16T19:43:54+5:30
सांगली : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी निश्चित झाली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...

Sangli: अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी निश्चित, मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट
सांगली : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी निश्चित झाली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर याबाबतचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांचे पुत्र विश्वास डांगे, चिमण डांगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम उपस्थित होते.
अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर भाजपमधून मंत्रिपदापर्यंत त्यांनी राजकारणात मजल मारली. विविध पदे भूषवली. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला होता.
सडेतोड वक्तृत्वामुळे प्रशासनात तसेच राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. राज्यात महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात जयंत पाटील होते. त्यावेळी जयंत पाटील व शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे पुत्र चिमण डांगे, विश्वास डांगे यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत इस्लामपूर पालिकेत डांगे गटाचा झेंडा रोवला होता. परंतु राष्ट्रवादीत अण्णासाहेब डांगे यांचे मन रमले नाही.
भाजपशी त्यांचे सलोख्याचे संबंध कायम होते. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे नेतृत्व व अन्यत्र भाजप नेत्यांशी सलगी अशी दुहेरी भूमिका चिमण डांगे यांना पार पाडावी लागत होती. राष्ट्रवादी फुटल्यानंतर डांगे यांचा कल भाजपकडे होता. आता अण्णासाहेब डांगे यांची भाजपची घरवापसी निश्चित झाली आहे.