शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्टिंग ऑपरेशन: कुणी स्टॅम्प देता का हो स्टॅम्प?, हताश सांगलीकरांचा सवाल 

By अविनाश कोळी | Updated: December 3, 2024 13:15 IST

कृत्रिम टंचाई करुन जादा पैसे उकळण्याचा फंडा

अविनाश कोळीसांगली : शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही जास्त रक्कम घेण्यासाठी काही विक्रेत्यांकडून स्टॅम्पचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. सातत्याने या गोष्टींचा सामना नागरिकांना करावा लागत असून सांगली शहरातील तुटवड्यामुळे आसपासच्या गावांमध्ये नागरिकांना धाव घ्यावी लागत आहे. ही बाब ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आली.न्यायालय, महसूल आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी तसेच शेतकऱ्यांनाही जमिनीचे व्यवहार, खरेदीखत, बक्षिसपत्रे या शेतीच्या कामांसाठी स्टॅम्प पेपर लागतात. यात या सर्व गरजवंतांची फसवणूक होत आहे. एकीकडे मुद्रांक विभागाकडून मुद्रांकाचा सुरळीत पुरवठा सुरू असताना विक्रेत्यांकडून नकारघंटा वाजविली जाते. सध्या शहरात अनेक सदनिकांच्या खरेदी-विक्रीसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहेत.परिणामी, शहरात मुद्रांकाचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा गैरफायदा घेत काही विक्रेते मुद्रांकाची चढ्या दराने विक्री करून घेत असल्याचे दिसत आहे. सेतू सुविधा केंद्रांसमोर असलेल्या मुद्रांक विक्रीच्या स्टॉलजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला चौकशीआधीच स्टॅम्प संपल्याचे बजावले जाते.

स्टिंग ऑपरेशनमध्ये काय दिसून आलेवेळ ५.०१, स्थळ : राजवाडा, सांगलीएका विक्रेत्याकडे आमच्या प्रतिनिधीने पाचशेच्या मुद्रांकाची चौकशी केली. त्याने सांगितले, गेल्या आठ दिवसांपासून स्टॅम्प आलेच नाहीत.वेळ ५.०५चौकशीनंतर एका विक्रेत्याने स्टॅम्प पेपर चार दिवसांपासून उपलब्ध नसल्याचे कारण दिलेवेळ ५.१०एका विक्रेत्याने आताच स्टॅम्प संपल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.

मुद्रांकाच्या रकमेनुसार जादा आकारणीशहरातील मुद्रांक विक्रेत्याकडे असलेल्या ५०० रुपयांच्या मुद्रांकासाठी ५५० रुपये मोजावे लागत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. यापूर्वीही जेव्हा शंभर रुपयांचा मुद्रांक सुरू होता तेव्हा त्यासाठी ११० रुपये आकारणी केली जात होती.

तीन टक्के कमिशन, मग जास्तीचे पैसे कशासाठी?शहरात २५ हून अधिकृत मुद्रांक विक्रेते आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून या विक्रेत्यांना मागणीप्रमाणे सरकारी चलन भरून रक्कम अदा केल्यानंतर मुद्रांक दिले जातात.प्रामुख्याने शासकीय मुद्रांकाचे ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल असे दोन प्रकार पडतात.प्रत्येक मुद्रांकामागे विक्रेत्यास २ ते ३ टक्के कमिशन मिळत असते; मात्र, मुद्रांकासाठी जास्तीचे पैसे का आकारले जातात, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

..तर संबंधितांवर कारवाई करूसांगलीत मुद्रांकाचा पुरवठा सुरळीत आहे. कोणतीही अडचण नाही. नागरिकांना स्टॅम्पची उपलब्धता केली जात नसेल, तर कृत्रिम तुटवडा निदर्शनास आल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुद्रांकाच्या रकमेपेक्षा जादा रक्कम आकारता येत नाही, तसा प्रकार दिसून आल्यास त्याबाबतही कारवाई केली जाईल. - अश्विनी सोनवणे-जिरंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली

टॅग्स :Sangliसांगली