शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

‘चांदोली’चे चारही दरवाजे खुले - : धरणातून ३४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:40 IST

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाºया धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजता उघडण्यात आले.

वक्राकार दरवाजातून २५०० व वीजनिर्मितीकडून ९०० क्युसेक असा ३४०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा वारणा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाºया धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या अतिवृष्टी व मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात १४ वेळा अतिवृष्टी झाली होती. पाणलोट क्षेत्रातून १४६४१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.सोमवारी रात्री १२ वाजता धरणातील पाण्याने सांडवा पातळी पार केली. गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले केले आहेत. त्यातून वारणा नदीत २५०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासात १२९ मिलिमीटर, तर गुरुवारी दिवसभरात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे व धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा - शित्तूर व चरण - सोंडोली पुलाच्या कठड्याला घासून पाणी वाहत आहे. कोकरुड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान, गुरुवारी दुपारी सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर, शाखाधिकारी टी. एस. धामणकर, रंगराव पाटील, रमेश यादव, बबन कांबळे यांच्याहस्ते धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.पाणीसाठा : वाढलाचांदोली धरण परिसरात गुरुवारअखेर २२६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६२३.३९ मीटर, तर पाणीसाठा ३०.५३ टीएमसी झाला आहे.चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी उघडल्यानंतर त्यातून फेसाळत बाहेर पडणारे पाणी.

टॅग्स :SangliसांगलीDamधरण