शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अजितराव घोरपडे भाजपशी अप्रामाणिक

By admin | Updated: December 29, 2016 00:07 IST

संजयकाका पाटील : राष्ट्रवादीच्या भल्यासाठी धडपड

सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपशी प्रामाणिक नाहीत. त्यांनी नेहमीच राष्ट्रवादीच्या भल्याची आणि सोयीच्या राजकारणाची भूमिका घेऊन काम केले आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, ढालगाव येथील शेतकरी मेळाव्यास भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. घोरपडेंचा या मेळाव्याशी संबंध नाही. नगरपालिका आणि त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घोरपडे यांनी कोणासाठी काम केले, हे सर्वांना माहीत आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आजवर त्यांनी सोयीचेच राजकारण केले.पक्षाशी ते प्रामाणिक राहिलेले नाहीत. ते भाजपमध्ये आहेत की कोणत्या पक्षात, याचाही आम्ही विचार करणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. यापुढे आम्ही कोणत्याही कार्यक्रमास त्यांना निमंत्रित करणार नाही. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या पक्षप्रवेशाच्या आॅफरबद्दल संजयकाका म्हणाले की, मला त्यांच्या आॅफरबद्दल माहिती नाही. जयंत पाटील यांना त्यांनी आॅफर दिली की राजकीय टीपणी केली, हे पाहावे लागेल. अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाने कोणते परिणाम होतील, या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. त्यावर वक्तव्य करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे नियोजन नाही. खासदार म्हणून मला तरी याबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)