शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:36 IST

अखेरच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी 

दत्ता पाटील

तासगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही काळापासून भाजपपासून अंतर राखून असलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक, मणेराजुरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. या निर्णयामुळे संजयकाका पाटील पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अजित पवार गटातील नेत्यांच्यात मतभेद या निवडणुकीत सत्तेच्या समीकरणांना धक्का बसला तो अजित पवार गटातील फुटीमुळे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांमध्ये उभी फूट पडल्याचे मतदानावेळी दिसून आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्यात मतभेद पहायला मिळत होते. हे मतभेद निवडीच्यावेळी देखील पहायला मिळाले. 

वाचा: जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडाअखेरच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात असणारे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अखेरच्या क्षणी मात्र भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे संजयकाका समर्थक सदस्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या पारड्यात मतदान टाकले. त्यामुळे संजयकाकांचे पुन्हा भाजपशी सलोख्याचे संबंध निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: Ajit Pawar faction split; Patil supporters vote BJP.

Web Summary : Sangli ZP election sees a twist as Sanjaykaka Patil's supporters voted for BJP, revealing a split in Ajit Pawar's faction and a shift in political alliances.