शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल उधार, शेतकरी बेजार

By admin | Updated: November 16, 2016 23:21 IST

सांगली बाजार समितीतील स्थिती

७0 कोटींची उलाढाल जुन्या नोटांच्या गोंधळामुळे झाली ठप्प व्यापाऱ्यांना उधारीवर माल देऊन उत्पादक ‘सलाईन’वर सांगली : हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मका, कांदा, गुळाची खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत, तर काही व्यापारी पैसे महिन्याने देण्याचा वायदा करत आहेत. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतकरी माल विकत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, पशुधन खरेदी-विक्रीची मागील तीन दिवसात ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या सोयाबीन, मका बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. परंतु, व्यापाऱ्यांकडे चलन नसल्यामुळे ते माल खरेदी करत नाहीत. हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा हा परिणाम आहे. किरकोळ बाजारात या मालास ग्राहक नसतो. त्यामुळे शेतीमाल हातात असूनही शेतकऱ्यांकडे रोजच्या खर्चासाठी पैसे नसल्याचे चित्र आहे. आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव तालुक्यात कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. कांदा काढून तयार आहे, पण पैसे नसल्यामुळे विक्रीसाठी कांदा आणू नका, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे, तर काही शेतकऱ्यांचा कांदा उधारीवर खरेदी करत असल्याचे व्यापारी मोहन माने यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेकडून पैसेच मिळत नाहीत. आम्ही खरेदी केलेला कांदा अन्य बाजारपेठेत पाठवतो. त्या व्यापाऱ्यांकडेही नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. कांदा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नको, म्हणून आम्ही खरेदी करीत आहोत, पण हे व्यवहारही उधारीवरच सुरू आहेत. विष्णुअण्णा फळमार्केटमधील ७० ते ८० लाखांची रोजची उलाढाल ठप्प झाल्याचेही माने यांनी सांगितले. सांगली मार्केट यार्डातील रोजचे पंधरा ते वीस कोटींचे अन्नधान्य, सोयाबीन, गूळ, मका खरेदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या किरकोळ व्यवहार व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरच सुरू असल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाळ मर्दा यांनी सांगितले. बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार, विष्णुअण्णा फळमार्केट येथील ३५ टक्के, पशुधन विक्री बाजारामधील ४० टक्के आणि सांगली मार्केट यार्डातील ५० टक्के उलाढाल बंद असल्याचे सांगण्यात आहे. हजार-पाचशे रूपयांचे चलन बंद केल्यामुळे तीन्ही बाजारपेठेतील तीन दिवसांमध्ये ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरी, व्यापारी व ग्राहकांकडे चलन फिरते राहिल्याशिवाय उलाढाल वाढणार नाही, अशीच परिस्थिती आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन चलन हवे तेवढे देण्याची व्यवस्था केली पाहिजे, अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.(प्रतिनिधी) हमालांची उपासमार सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, गणपती पेठ येथील उलाढालीवरच हमालांच्या हाताला काम मिळत असते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून सांगली बाजारपेठेतील उलाढालच घटली आहे. त्यामुळे हमालांच्या हातालाही काम नसल्यामुळे त्यांना रोज रिकाम्या हातानेच घरी परत फिरावे लागत आहे. रोजच्या कमाईवरच काही हमालांचा संसाराचा गाडा चालू असतो. परंतु, चार दिवसात त्यांच्या हातालाच काम नसल्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बाजारपेठ सुरळीत कधी होणार आणि आपल्या हाताला काम कधी मिळणार?, असा प्रश्न हमालांना भेडसावत आहे.