सांगली : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १०० टक्के काॅपीमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला. तरीही कॉपीचा एक प्रकार सापडला. संबधित परीक्षार्थीवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.बेळंकी (ता. मिरज) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात वाणिज्य शिक्षणक्रमाच्या एका पेपरला कॉपीचा प्रकार निदर्शनास आला. एका विद्यार्थिनीने पॅडवर काही मजकूर कॉपी स्वरूपात लिहून आणल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील सदस्यांनी पॅड, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका जप्त केली. संबंधित विद्यार्थिनीला परीक्षा मंडळाच्या नियमानुसार दुसरी प्रश्नपत्रिका दिली. कारवाईचा अहवाल परीक्षा मंडळाला पाठविला. त्यानंतर आता मंडळाच्या नियमांनुसार संबंधित विद्यार्थिनीचा जबाब, पर्यवेक्षकाचा जबाब व अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा १०० टक्के काॅपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने अनेक प्रकारचा कडेकोट बंदोबस्त केला होता. मंडळाच्या सूचनेनूसार सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्याद्वारे परीक्षा दालनातील परीक्षार्थींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आले. कॅमेऱ्यातील चित्रण सांभाळून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक परीक्षा दालनात मोबाइलद्वारे चित्रण करून झूम प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतूनही त्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. थोड्याशाही आक्षेपार्ह हालचाली दिसल्यास ताबडतोब पर्यवेक्षकाला सतर्क करण्यात येत होते. या उपायांची परिणीती म्हणून सर्वत्र कॉपीमुक्त परीक्षा झाल्या. पण बेळंकी महाविद्यालयातील एका कॉपी प्रकरणाने या उपायांमधील त्रुटी समोर आणल्या. पुढील परीक्षांमध्ये आणखी काटेकोर उपायांची गरज असल्याचे दाखवून दिले.
कोल्हापूर परीक्षा मंडळाच्या कार्यकक्षेत यावर्षी कॉपीचे एकमेव प्रकरण आढळले. बारावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील एका केंद्रात एक परीक्षार्थी कॉपी करताना सापडला. त्याच्यावर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. - राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय परीक्षा मंडळ
Web Summary : Despite strict security, a student in Sangli was caught cheating during the 12th-grade exam. The incident occurred at Belanki College. Authorities seized the evidence and initiated action per board rules, highlighting security loopholes.
Web Summary : कड़ी सुरक्षा के बावजूद, सांगली में 12वीं की परीक्षा में एक छात्रा नकल करते पकड़ी गई। घटना बेळंकी कॉलेज में हुई। अधिकारियों ने सबूत जब्त कर बोर्ड के नियमों के अनुसार कार्रवाई शुरू की, जिससे सुरक्षा में खामियां उजागर हुईं।