Sangli: आटपाडीत वाळू तस्करीवर मोठी कारवाई, तब्बल ७० ब्रास वाळू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:04 IST2025-04-04T16:04:18+5:302025-04-04T16:04:50+5:30

आटपाडी: आटपाडी महसूल विभागाने अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत माणगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात ७० ब्रास वाळू जप्त ...

action against sand smuggling in Atpadi, 70 tons of sand seized | Sangli: आटपाडीत वाळू तस्करीवर मोठी कारवाई, तब्बल ७० ब्रास वाळू जप्त

Sangli: आटपाडीत वाळू तस्करीवर मोठी कारवाई, तब्बल ७० ब्रास वाळू जप्त

आटपाडी: आटपाडी महसूल विभागाने अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत माणगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात ७० ब्रास वाळू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःतहसीलदार सागर ढवळे व महसूल पथकाने ही धडक कारवाई केली.

या मोहिमेत तलाठी विनायक बालटे, विनायक पाटील, अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जाविर ,पोलीस पाटील वैभव देशमुख , संतोष आईवळे , प्रभाकर पूजारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत सदर वाळू जप्त केली.

दंडात्मक कारवाईचा इशारा

ज्या वाहनांद्वारे ही वाळू वाहतूक व डेपो करण्यात आला आहे, त्या वाहनचालकांची व मालकांची स्थानिक चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन  तहसीलदार सागर ढवळे यांनी केले.

Web Title: action against sand smuggling in Atpadi, 70 tons of sand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.