नागजमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:54 PM2020-01-24T15:54:03+5:302020-01-24T15:55:47+5:30

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह वाळूसाठा महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. गुरुवारी पहाटे चार वाजता नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील चार वाहने ताब्यात घेण्यात आली. एकूण १४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ​

Action against illegal sand trafficking in Nagaj | नागजमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

नागजमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

Next
ठळक मुद्देनागजमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसात जणांविरुध्द कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कवठेमहांकाळ : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकसह वाळूसाठा महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. गुरुवारी पहाटे चार वाजता नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील चार वाहने ताब्यात घेण्यात आली. एकूण १४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, वाळू तस्करी करणारी वाहने कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयात आणत असताना मंडल अधिकारी उत्तम कांबळे यांना वाळू माफियांनी जोरदार धक्काबुक्की केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातजणांविरुध्द कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणगावचे मंडल अधिकारी उत्तम देवाप्पा कांबळे (रा. विद्यानगर, ता. कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात पहाटे फिर्याद दाखल केली आहे. पहाटे चार वाजता नागज हद्दीत किडेबिसरी रस्त्यावर मंडल अधिकारी कांबळे यांच्या पथकाने छापा टाकून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक, ट्रकमधील वाळू, एक मोटार ताब्यात घेतली आहे.

यात ट्रक (क्र. एमएच १०, ए.डब्ल्यू. ४०८९) व चार ब्रास वाळू, याची एकूण किंमत तीन लाख ३२ हजार, ट्रक (क्र. एमएच १०, बी. आर. ४०८९) व त्यातील चार ब्रास वाळू, एकूण किंमत तीन लाख ३२ हजार, तसेच ट्रक (क्र. एमएच १०, सी. आर. ६९८९) व त्यातील चार ब्रास वाळू, असे मिळून पाच लाख ४८ हजार रुपये व बिगर नंबरची लाल रंगाची मोटार (किंमत दोन लाख रुपये) असा एकूण १४ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सचिन विष्णू कुंभार (रा. शिरढोण), गणेश मंडले (रा. वाघोली), अविनाश वाघमोडे (रा. गुळवंची), सतीश पुजारी (रा. जयसिंगपूर), अमित कुंभार (रा. शिरढोण), ॠषिकेश हुलवान (रा. शिरढोण) व उमेश कोळेकर या सात जणांविरुध्द कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यातील उमेश कोळेकर हा आरोपी फरार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे करीत आहेत.

Web Title: Action against illegal sand trafficking in Nagaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.